Thursday, 7 March 2013

मन तरंग....(आठवांच्या या झुल्यावर)


मन तरंग....(आठवांच्या या झुल्यावर)

ओल्या आठवणींच्या वाटा,
खुणावती या कोरड्या मनाला,
हरवलेल्या त्या आठवणी भेटताना,
पुन्हा भरकटल्यात त्या तुला शोधताना.......

लाजाळु प्रमाणे मन माझे,
पटकन घेते अंग चोरुनी,
तेही मग अलगदच जाते,
आठवणींच्या कुशीत शिरुनी........

रास खेळत चंद्र चांदण्या,
करी चमचम उत्साहाने,
तार्‍यांचा हा खेळ येता रंगात,
ढगोबाही हळुच लपंडाव करे........

तुझ्या विना झुले आठवणींचा हिंदोळा,
ओथंबले जरी दु:ख सुगंधल्या त्या कळा,
संधीप्राकाशातली ही संध्याकाळ,
हरवलेल्या क्षणांच्या फुलांची दिपमाळ.....

जसा तो मोरपीस फिरे संगे
आठवांच्या तुझ्या;
तसा काटा सरसर,
उडे तुटे शिशिरासम,
ध्यान माझे वेडेपिसे मन.......

No comments:

Post a Comment