कस
जमत रे तुला
मनाशी
लपंडाव खेळायला
जाणते
पणीही,अजाणते बानयला....
कस
जमत रे तुला
मागचा
पुढचा विचार न करता
शब्दांच्या
नगरीत सुसाट धावायला....
कस
जमत रे तुला
या
ओसाड माळरानावर
प्रेमांकुर
फ़ुलवायला.......
कस
जमत रे तुला
चाहुलीने
तुझ्या मन सैरभैर व्हायला लावायला
मनतरंगावरचे
हे फ़ुल अलगद उमलवायला......
कस
जमत रे तुला
तुझी
स्वप्न माझी करुन
त्यांच्यात
हरवायला,आणि आठवुन पुन्हा ते दिवस जगवायला.....
कस
जमत रे तुला
त्या
स्वप्नांच्या ध्यासात
त्यांच्यामागे
धावायला.....
Nice Nixx....
ReplyDelete:)
Deletechhan aahe hi kavita....
ReplyDelete