Friday, 22 November 2013

हा खेळ भावनांचा.....


अस वाटत सगळ विसरून तुझ्या मिठीत सामाऊन जाव ,
या गर्दीतही नजर फक्त तुलाच शोधतीये ,
म्हणूनच कदाचित आज इच्छाच न्हवती तुझा हात सोडायची ….

का कोण जाणे भावनांचा हा खेळ का छळतोय मला ,
तुझ्याच आठवणीत दिवस रात्र सतावतेय मला ,
म्हणूनच कदाचित आज इच्छाच न्हवती तुझा हात सोडायची ….

तूच सांग कस आवरू आता ह्या मनाला ,
प्रत्येक गाण्यात आहेत तुझेच शब्द ,
प्रत्येक श्वासात आहे तुझाच गंध
कोण आवरणार आता ?
म्हणूनच कदाचित आज इच्छाच न्हवती तुझा हात सोडायची ….

स्वप्नातही आहे तुझीच नशा ,
या नशेचा रंग उतरतोय कुठे ,
या रंगात न्हाऊन तुझ्यात एकरूप होतीये ,
म्हणूनच कदाचित आज इच्छाच न्हवती तुझा हात सोडायची ….
आज इच्छाच न्हवती तुझा हात सोडायची ….

Saturday, 19 October 2013

तु पुन्हा केव्हा येणारेस????

उदास संध्याकाळी मनात होते असंख्य विचार
आठवणींच्या लहरी उठताच उरात उठल्या कळा...

साता-जन्माची साथ करणार होतास ना रे तु?
अचानक न बोलता कसा गेलास तु?

मोह उरलाच नाही का आपल्या प्रेमाचा
गंध नसेल पण रंगाच वरदान आहे मला....

मनाशी जुळ्लेल्या मनाच नात असचं का तोडुन जाणारे
एवढ तर सांगुन जा या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तु पुन्हा केव्हा येणारेस???

तु पुन्हा केव्हा येणारेस????

********मैत्री तुझी नी माझी*************



ठरवल आहे मनाने, करुया आपणही कविता आपल्या मैत्रीवर
मग मनानेच पुन्हा मनाला विचारलं
कि या मैत्रीचा अर्थ तरी काय ???
या स्वार्थी जगात तुझ्या मैत्रीचा उपयोग तरी काय ?
नसतो फक्त इथे फक्त उपयोग असते जीवाभावाची साथ......

मैत्री म्हणजे त्यागाची भावना,नात्यातील ताजेपणा
मानातील मांगल्य,ओठावरील हसु आणि डोळ्यातील आनंदाश्रु
मैत्रीच्या भावना जपायलाही लागते तितकच कोवळ मनं
कारण या कोवळ्या मनातच उमलते मैत्रीची नाजुक कळी.........

अखेर नैत्री तुझी नी माझी ,सार्‍या जगाहुन निराळी
नाही याला कसला स्वार्थ
कारण मैत्रीत नसतो कधी पैशांचा बाजार
इथे असतो फक्त भावनांचा आधार.......
आधार असतो एकमेकांचा प्रत्येक क्षण जगण्याचा
जगलेले प्रत्येक क्षण अनुभवण्याचा
असेलही बरेच मित्र ,मैत्रीणी तुझ्या
पण मी निराळी नक्कीच कुणी नसेल.......

Friday, 26 July 2013

क्षण

किती मस्त होता तो क्षण,
तू हातात घेतलेला माझा हात,
तुझ्या चेहऱ्यावरचे ते भाव,


किती मस्त होता तो क्षण...
तुझी ती गर्दित मला शोधणारी नजर,
तुझी आतुरतेने वाट पाहणारी ती नजर,


किती मस्त होता तो क्षण...
तुझ्या मिठीत रमून जाण्याचा,
दिलखुलास प्रेम करण्याचा आनंद,


किती मस्त होता तो क्षण...
स्वप्नात येवुनही दिलास मला तो आनंद,
निद्रेच्या मिलनात झाले होतो आपण गुंग,
ती धुंदी पण एकच सांगत होती,

Tuesday, 16 July 2013

"प्रेम"

"प्रेम" जगातली सर्वांत सुंदर अशी एक गोष्ट....
Awesome Feeling
आपण कोणालातरी आवडण आणि आपल्याला सुध्दा कोणीतरी आवडणे हे सांगुन नाही समजायच कोणाला त्यासाठी हे अनुभवावच लागत...ते बघणं,ते डोळ्यातुन मनात साठवण,त्याच बोलण त्याच दिसण सगळच मग अद्भुत असल्या सारखंच भासु लागत....

आयुष्याच्या कुठल्या तरी वळणावर आपण एकदा तरी प्रेमात पडतोच,कोणतीतरी नजर प्रत्येकाला आव्हान देऊन जातेच  आणि अगदी तोच तोच तो 'क्षण' जेव्हा आपण स्वता:चे नसतोच...मग आपणही

त्या प्रवाहाबरोबरच वाहु लागतो,ते वाहत जाण सुध्दा खुप वेड लावणार असत.....

Monday, 15 July 2013

कस जमत रे तुला

कस जमत रे तुला
मनाशी लपंडाव खेळायला
जाणते पणीही,अजाणते बानयला....

कस जमत रे तुला
मागचा पुढचा विचार न करता
शब्दांच्या नगरीत सुसाट धावायला....

कस जमत रे तुला
या ओसाड माळरानावर
प्रेमांकुर फ़ुलवायला.......

कस जमत रे तुला
चाहुलीने तुझ्या मन सैरभैर व्हायला लावायला
मनतरंगावरचे हे फ़ुल अलगद उमलवायला......

कस जमत रे तुला
तुझी स्वप्न माझी करुन
त्यांच्यात हरवायला,आणि आठवुन पुन्हा ते दिवस जगवायला.....

कस जमत रे तुला
त्या स्वप्नांच्या ध्यासात
त्यांच्यामागे धावायला.....


Wednesday, 12 June 2013

अशी ती माझी साजणी. .......

प्रियकर आपल्या प्रेयसीला उद्देशुन.....

प्रेमाची परिभाषा व्यक्त करणारी एक भावना....................



शृंगार नसला तरी तितकीच सुंदर दिसणारी,

नक्षत्र सुध्दा फ़िके पडतील तिच्या समोर,

चंद्रास सुध्दा लाजवे असे जिचे रुप,

अशी ती माझी साजणी. .......



पाण्याच्या रंगासम निर्मळ,

फ़ुलांच्या गंधासम मोहक,मधासम मधाळ,

तैसे मनी भाव,

अशी ती माझी साजणी........



सतत स्वप्नांच्या दुनियेत रमणारी,

जसे स्वप्नासही आणे कधी सत्यात,

तसे नभातही दाटुन येईल आभाळ,

तिच्या विचारांची पाखरे उडे स्वैर भैर

अशी ती माझी साजणी. .......



जसा रागही असे सतत नाकवर,

तशी बडबडी सर्वांशी आपलेपणाने,

नसे तिला कोणा दुसर्‍याची परवा,

जेव्हा असे साजणा तिच्या सोबतीला,

अशी ती माझी साजणी. .......



लाखात एक अशी निराळी,

जिव्हाळ्याने आपुलकीने सर्वांना सांभाळणारी,

सर्वांस हवी हवीशी वाटणारी,

अशी ती माझी साजणी. ......



बावर्‍या मनात घर करुन रहाणारी,

या वेड्या मनाची लाडकी,

खली नसली तरी देखील फ़ुलुन दिसणारी,

अशी ती माझी साजणी.......

-:सुंदर माझे घर:-

 -:सुंदर माझे घर:-



भातुकलीच्या खेळातल,

जसं राजा आणि राणीचं,

अंगणातील टपोर्‍या फुलांसारख,

सुंदर माझे घर,

सुंदर माझे घर.......




अनोळखी फांदिवरच्या फुलाला,

झाडाखालील नितळ छाया,

अंगाणातील पक्षांनाही,

हवे हवेसे वाटणारे,

सुंदर माझे घर,

सुंदर माझे घर.........




नसतातच नुसत्या चार भिंती,

असतो त्यात मायेचा ओलावा,आणि प्रेमाचा गोडवा

ह्याच सुंदर क्षणांनी बहरते ते,

सुंदर माझे घर,

सुंदर माझे घर.........






घरातल्या घरपणाचे,

हे नाते असते सार्‍यांच्या जिवाभावाचे,

थोरांपासुन-लहानांपर्यंत रमतात सारे इथे,

असे सुंदर माझे घर,

सुंदर माझे घर...............






जशी निलयातील निखळ आर्द्रता,

तशी असते मनाची संक्षिप्त भावना,

आकडेमोडीतही मोजतो आपण ही स्वप्नांची गणिते,

असे सुंदर माझे घर,


सुंदर माझे घर...............

Thursday, 7 March 2013

मन तरंग....(आठवांच्या या झुल्यावर)


मन तरंग....(आठवांच्या या झुल्यावर)

ओल्या आठवणींच्या वाटा,
खुणावती या कोरड्या मनाला,
हरवलेल्या त्या आठवणी भेटताना,
पुन्हा भरकटल्यात त्या तुला शोधताना.......

लाजाळु प्रमाणे मन माझे,
पटकन घेते अंग चोरुनी,
तेही मग अलगदच जाते,
आठवणींच्या कुशीत शिरुनी........

रास खेळत चंद्र चांदण्या,
करी चमचम उत्साहाने,
तार्‍यांचा हा खेळ येता रंगात,
ढगोबाही हळुच लपंडाव करे........

तुझ्या विना झुले आठवणींचा हिंदोळा,
ओथंबले जरी दु:ख सुगंधल्या त्या कळा,
संधीप्राकाशातली ही संध्याकाळ,
हरवलेल्या क्षणांच्या फुलांची दिपमाळ.....

जसा तो मोरपीस फिरे संगे
आठवांच्या तुझ्या;
तसा काटा सरसर,
उडे तुटे शिशिरासम,
ध्यान माझे वेडेपिसे मन.......

Tuesday, 22 January 2013

दिवस पहील्या भेटीचा



आजही आठवतोय तो दिवस
दिवस आपल्या पहील्या भेटीचा
भेटीतील पहील्या नजरेचा
डोळ्यातील त्या मुक्या भाषेचा....

आजही आठवतोय तो दिवस
दिवस आपल्या पहील्या ओळखीचा
ओळखीतील त्या दोन अबोल शब्दांचा
शब्दांतील त्या विचारांचा......

आजही आठवतोय तो दिवस
दिवस माझ्या प्रितीचा
पाहील्यावर तुला 
तर्क वितर्क लावण्याचा....

आजही आठवतोय तो दिवस
दिवस आपल्या नात्याचा
नात्यातील या विश्वसाचा
विश्वासातील तुझ्या सोबतीचा.....

आजही आठवतोय तो दिवस
हलकेच लाजुन नकळत इशार्‍याचा
न बोलुन सुध्दा खुप काही बोलण्याचा
मनाच्या हिंदोळ्यावर पाखरु होऊन नाचण्याचा
दिवस आपल्या पहील्या वहील्या भेटीचा.......